चिपळूण : शहरातील पेठमाप व बाजारपेठ भागातील प्रमुख रस्त्यावरील गटाराचे बांधकाम व रोड क्रॉस मोरीचे बांधकाम २ डिसेंबरला सुरू करण्यात येणार आहे. अरूंद रस्त्यावरील ही कामे असल्याने काम पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्ते बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगर परिषदेकडून कळविण्यात आले आहे. विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत चिपळूण नगर परिषद हद्दीतील बाजारपेठ परांजपे हॉटेल, सदिच्छा कुशनिंग वर्क्स ते नाथ पै चौक, मजिद शेख खाटीक आळी घरापर्यंत आर.सी.सी. गटाराचे बांधकाम आणि पेठमाप बौद्ध स्मशानभूमी स्तंभ येथे रोड क्रॉस मोरीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी गटार व रोड क्रॉस मोरीचे बांधकाम करणे इ. कामे अरूंद रस्त्यावरील असल्याने कामासाठी हा रस्ता काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवावा लागणार आहे. या भागातील नागरिक, वाहनधारकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 02/Dec/2024














