रत्नागिरी : रत्नागिरी पालिका हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी केली जाणार आहे. यामुळे परिसरामध्ये रेडिएशन होऊ शकते. याचा पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावरे यांना इजा होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेसाठी २ ते ५ डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येणार आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश आज दिले आहेत. आदेशात म्हटले आहे की पोलीस अधीक्षकांकडील प्राप्त अहवालात त्यांनी २ डिसेंबर ते ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यत नगरपालिका हद्दीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याकरिता पुतळ्याच्या परिसरातील रस्ते बंद करण्याची सूचनान केली आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २ ते ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते ४ वाजेपर्यंत पुतळ्यांच्या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीची कोंडी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 02-12-2024














