रत्नागिरी : निसर्गातील वैशिष्ट्यांचा प्रत्यक्ष फिरत परिचय करुन देणारा ‘निसर्ग भ्रमंती’ हा एक दिवसीय उपक्रम संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे येत्या शनिवारी (७ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे.
कोकणच्या निसर्गाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहण्यास शिकणे, ‘जैवविविधता’ या संकल्पनेची ओळख करून घेणे, तसेच पर्यावरण जतन व संवर्धनाबद्दल विचार करण्याची वृत्ती जोपासणे हे या उपक्रमाचे उद्देश आहेत.
कोकण विज्ञान मंचातर्फे या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ पार्थ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शनिवारी राजवाडीच्या परिसरात भटकंती, (वृक्ष-वेली, प्राणी-पक्षी, कीटक इत्यादींची ओळख), निसर्ग खेळ/उपक्रम (जैवविविधता आणि माणूस यांच्यातील संबंध), पर्यावरण-संगीत (पर्यावरणाचे जतन संवर्धन), प्रश्न-मंजुषा, निसर्ग साहित्य, चर्चा, गप्पा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. याबरोबरच अस्सल कोकणी रुचकर शाकाहारी नाश्ता-जेवणही राहणार आहे
व्यक्तिगत संवाद आणि समन्वयाच्या दृष्टीने फक्त वीस जणांना यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सकाळी ८.३० ते दुपारी ३ या वेळेत चालणाऱ्या या कार्यक्रमात १२ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या सशुल्क कार्यक्रमात सहभागासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी
सतीश कामत (९८६०८३७३९७/७४९९८७४५४)
किंवा अमोल लोध (९८२२११८८५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 02/Dec/2024














