चिपळूण : उमरोली घोणसरे येथे आज ग्रामदेवतेच्या पालख्यांचे स्नेहमिलन

रामपूर : चिपळूण तालुक्यातील उमरोली (घोणसरे) येथे आज २ रोजी देव दीपावलीनिमित्त बगाड दुपारी १ वा. नवसाची लाट फिरवणे, यानिमित्त देवखेरकी येथील शंकराची पालखी, देवखेरकी ग्रामदेवता, शिरवली ग्रामदेवता, आंबेरे ग्रामदेवता, यजमान ग्रामदेवतेच्या स्नेहमिलन भेटीचा अनोखा कार्यक्रम, भक्तांच्या मनोरंजनासाठी देवरुख कुळेवाडी येथील नमन रात्री १०.३० वा. होणार आहे. सर्व भक्तांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उमरोली घोणसरे ग्रामस्थांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 02/Dec/2024