रत्नागिरी : रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखालील पाया मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले. शनिवारी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा स्थानापन्न झाला आहे. कमकुवत झालेला पाया पुन्हा मजबूत करण्यासाठी पुतळा १८ नोव्हेंबर रोजी काढून रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहात सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यात आला होता.
रत्नागिरी शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षिततेची तपासणी करणारे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले होते. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पाया कमकुवत झाल्याने हलत असल्याचे दिसून आले होते. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी तातडीने तो पाया सुरक्षित करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बांधकाम विभागाचे अभियंता यतिराज जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून तो सभागृहात ठेवला होता. त्या नंतर वेगाने पाया मजबुतीचे काम पूर्ण करून घेतले. शनिवारी हा पुतळा सुरक्षित पायावर स्थानापन्न करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 02/Dec/2024














