रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी शनिवारी भाजप कार्यालयाला भेट दिली आणि निवडणुकीत विजयासाठी मदत करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी प्रकर्षाने दिसून आली ती अंतर्गत गटबाजी. निवाणुक प्रचारादरम्यान मोठ्या पुढाकाराने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणारे अनेक नेते मात्र या कार्यक्रमाला हजर नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. ज्यांनी महायुती उमेदवाराच्या विरोधात काम केले त्याला सदर कार्यक्रमाला आम्हाला बोलवण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. यामुळे भाजप मधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.
नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांचा सत्काराचा कार्यक्रम भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. भाजप चे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी या कार्यक्रमासाठी भाजप नेत्यांना निमंत्रण पाठविले होते. मात्र या कार्यक्रमाला भाजप मधील अनेक नेते मंडळी अनुपस्थित होती. विशेष म्हणजे हीच मंडळी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा झोकून देत प्रचार करताना दिसत होती. यामध्ये प्रामुख्याने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, शहर प्रमुख सचिन करमरकर, माजी तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे, माजी नगरसेवक ब उमेश कुळकर्णी, शिल्पाताई पटवर्धन आदी अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र या सर्वांनी या सत्काराचा कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 02-12-2024














