राजापूर : भूमी अभिलेख विभागाकडून केल्या जाणाऱ्या मोजणी शुल्काच्या नवीन धोरणाची अंमलबजावणीला कालपासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये नवीन जमीन मोजणी धोरणानुसार नियमित जमीन मोजणीचा कालावधी नव्वद दिवसांच्या आत करताना जमीन मोजणांचा तातडी, अतितातडी हे प्रकार बंद केला आहे. त्याऐवजी नियमित आणि द्रुतगती असे मोजणीचे दोन प्रकार ठेवले आहेत.
त्यामध्ये द्रुतगती जमीन मोजणीचा कालावधी तीस दिवस केला आहे. त्याचवेळी जमीन मोजणीसाठी यापूर्वी १३० दिवसांचा कालावधी होता. तो आता कमी करून १० दिवसांवर आणण्यात आल्याने जमीन मोजणी प्रकरणाचा निपटारा तत्काळ होणार आहे. आपल्या मालकीच्या जमिनीची निश्चित करणे वा आपल्या ताब्यात असलेली जमीनीचे कागदोपत्री असलेले क्षेत्र नेमके कसे विस्तारलेले हे जाणू घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून जमिन मालकांकडून जमिन मोजणी केली जाते. ही जमीनमोजणी भूमिअभिलेख विभागाकडून केली जात असून त्यासाठी त्यांच्याकडून जमीन मोजणी शुल्काची आकारणी केली जाते. जमीन मोजणीचे पूर्वी असलेले धोरण वेळखाऊ करणारे असल्याने त्याबाबत शेतकरी या जमीन मालकांकडून नाराजीचे सूर उमटत होते. त्यापी वखत घेवून शासनाने जमीन मोजणीचे नवीन धोरण निश्चित केले आहे. त्याची कालपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे.
नगरपालिका हद्दीसाठी तीन हजार शुल्क
नगरपालिका हद्दीमधील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीस तीन हजार रुपये, तसेच द्रुतगती मोजणीसाठी ९२ हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील पुढील प्रत्येक एक हेक्टरसाठी नियमित एक हजार ५०० रुपये व नगनी मोजणीसाठी सहा हजार रुपये मोजणी शुल्क आकारले जाणार आहेत.
कंपन्यांसाठी वेगळे दर
या व्यतिरिक्त कंपन्यांसाठी काही वेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कंपन्या इतर संस्था विविध प्राधिकरणे, महत्व भूसंपादन संयुक्त मोजणीसाठी सर्व्हे नंबर, तसेच गट नंबर, पोटहिस्सासा आणि सिटी सर्व्हे, फायनल प्लॉट क्रमांक, मंजूर रेखांकनातील एका भूखंडासाठी एक हेक्टरपर्यंत नियमित मोजणीकरिता तीन हजार रुपये, दुतगती मोजणीसाठी १२ हजार रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आलेले आहेत त्याच सर्व्हे नंबरमधील पुढील प्रत्येक एक हेक्टरसाठी नियमित एक हजार ५०० रूपये व द्रुतगती मोजणीसाठी दहा हजार रुपये लागणार आहेत.
पालिका हद्दीबाहेरील मोजणीसाठी दोन हजार शुल्क
नगरपालिका हद्दीबाहेरील क्षेत्रासाठी आणि सिटी सर्व्हे फायनल प्लॉट क्रमांक मंजूर रेखाकनातील एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणेकरिता दोन हजार रुपये, द्रुतगती मोजणीसाठी आठ हजार रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील पुढील प्रत्येक दोन हेक्टरसाठी नियमित एक हजार रुपये द्रुतगती मोजणीसाठी चार हजार रुपये मोजणी शुल्क आकारले जाणार आहे.
शासनाने जमीन मोजणीचे नवीन धोरण निश्चित केले असून, त्यामध्ये नव्या धोरणात जमीन मोजणीचा कालावधी कमी केला आहे. त्यामुळे जमीन मोजणी प्रकरणांचा वेळेमध्ये निपटारा होण्यास मदत होणार असून, हा निर्णय निश्चितय स्वागतार्ह आहे. राकेश जोशी, शेतकरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 02/Dec/2024














