काकडे हेल्प अॅकॅडमीतर्फे देवरुख ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी रक्तदान शिबिर

देवरुख : शहरातील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त ५ रोजी देवरुख ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत हे शिबीर होणार आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य करणाऱ्या राजू काकडे अॅकॅडमीने रक्तदान शिबीर घेवून रक्त साठ्यात मोलाचा हातभार लावण्याचे नियोजन केले आहे. अॅकॅडमी प्रतिवर्षी वर्धापन दिनी समाजोपयोगी कार्यक्रम घेत असतात याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबीर घेणार आहेत.

या शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी होवून राष्ट्रहिताचे कार्य करा, असे आवाहन अध्यक्ष गणेश जंगम व सल्लागार युयुत्सू आर्ते यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 02/Dec/2024