रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या हौशी मराठी नाट्य स्पर्धाना ६२ वर्ष पूर्ण झाली. शासनाच्या त्रेसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेच्या उपक्रमाला रत्नागिरी नाट्यप्रेमींकडून भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी राज्य नाट्य स्पर्धेच्या येथील केंद्रात आतापर्यंत तीन ते चार हजार रसिक मायबापांनी नाटकांचा आस्वाद घेतला. जिल्ह्यातील नाट्य संस्थांनी गेल्या चार दिवसांत केलेले प्रयोग रंगतदार झाले. शासनाच्या या उपक्रमांचे रंगकर्मीकडून कौतुक होत आहे. हा उपक्रम वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षाही ज्येष्ठ रंगकर्मीकडून केली जात आहे.
२६ नोव्हेंबरला राज्य नाट्य स्पर्धेच्या येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात सुरुवात झाली. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त अशा या सावरकर नाट्यगृहात पहिले नाट्य पुष्प सादर करण्याचा मान राजापूर तालुक्यातील येळवण (ता. राजापूर) येथील नाट्य संस्थेला मिळाला. लेखक राजेश देशपांडे यांची माझ्या ‘आजीचा ऑय फ्रेंड’ या विनोदी नाटकाने सुरवातीलाच धमाल उडवून दिली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेधील श्रीरंग-रत्नागिरी या संस्थेने माँफर्कोसिस या नाटकाचा प्रयोग केला. हिंदी अनुवादित या नाटकांतून लेखकाने नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्ट्रगल व स्टार कलाकारांना नाट्यअभ्यास, कलाकाराचा अहंकार यावर भाष्य करणारे नाटक सादर झाले, अतिशय वेगळ्या पद्धतीचा नाट्य प्रयोग रसिकांना पाहायला मिळाला. प्राथमिक फेरीचे तिसरे नाटक अखेरचा सवाल हे सिद्धहस्त लेखक वसंत कानेटकर यांची १९७२ ची सत्य घटनेवर आधारित नाटक तालुक्यातील पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थाने सादर केले. स्पर्धेतील चौथे नाटक येथील संकल्प कलामंचच्या रत्नागिरीने सादर केले. आत्तापर्यंत विनोदी नाटक, नाट्यक्षेत्रातील अभ्यास-अर्हकारी कलाकार, सत्य घटनेवर आधारित आरोग्यविषयक आणि गुन्हेगारी आणि वकिली, या विषयावर भाष्य करणाऱ्या संहिता सादर झाल्या. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अजूनही राज्य नाट्य स्पर्धेत चार नाटकांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. या सर्व नाटकांचे परीक्षण नागपूर, औरंगाबाद, नाशिक येथील परीक्षक शिवानंद चलवादी, कैलास टापर आणि मौना वाघ करत आहेत.
नाट्यगृहात नाट्यप्रेमांनींना एसीमध्ये नाटक पाहता येत आहे. फक्त स्वच्छतेसाठी कुणालाही खाद्य पदार्थ प्रेक्षागृहात आणू नयेत, अशी सूचना देण्यात येत आहे. यावर्षी पद्य नाटकाला मायबाप रसिकांचा ओघ वाढला आहे. दिवसेंदिवस शासनाच्या या उपक्रमाला रंगकर्मीकडून दाद दिली जात आहे. येत्या चार दिवसांत महानायक, चांदणी, कडीपत्ता आणि स्वप्नपक्षी ही चार नाटके होणार आहेत. रसिकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा. – नंदकिशोर जुवेकर, समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 02/Dec/2024














