सावंतवाडी-दिवा रेल्वेखाली टेरवमधील प्रौढाची आत्महत्या

चिपळूण : तालुक्यातील टेरव लिंगेश्वरवाडी येथील एकाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना खेर्डी येथे शनिवारी दुपारी घडली. मिलिंद विलास कदम (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेनंतर टेरव गाव परिसरात खळबळ उडाली. मिलिंद कदम हे टेरव ग्रामपंचायत सदस्या मानसी कदम यांचे पती होत.

कोकण रेल्वे मार्गावरील खेर्डी येथे कदम यांनी सावंतवाडी-दिवा रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले व त्यांनी मिलिंद कदम यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात या बाबतची नोंद करण्याचे काम सुरू होते. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 02-12-2024