कडवई : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने कारला जोरदार धडक दिल्याने तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबईकडून गोव्याकडे चाललेला कंटेनर चालक श्रीराम दीनदयाळ गुप्ता (५६) राहणार उत्तरप्रदेश हा आपल्या ताब्यातील कंटेनर (जीजे १५ एव्ही ७६२५) घेऊन जात असताना तुरळ डिकेवाडी फाट्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात ईर्टिगा कारला धडकला. एर्टिगा गाडी (क्र. एमएच ०८ एएक्स ५७३४) ही मालक अरमान सलीम शेख राहणार कळंबस्ते, चिपळूण व त्यांच्यासोबत संजय दत्ताराम सावंत राहणार वालोपे हे होते. कंटेनर धडकेत इटिंगा गाडीच्या उजव्या बाजूचे मोठ्या नुकसान झाले व चालक अरमान शेख व संजय सावंत हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार एस. एस. कोलगे व पोलिस कॉन्स्टेबल एस. डी. खाडे यांनी वाहने बाजूला करून जखमींना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात भरती केले. याबाबत पुढील तपास एस. एस. कोलगे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 02/Dec/2024














