माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आरवली – माखजन मार्गावर दर अर्ध्या तासाने सुटणाऱ्या आरवली- माखजन व माखजन आरवली एसटी बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. याचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे. देवरूख आगाराने या बसफेऱ्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी महेश बाष्टे यांनी केली आहे. या फेऱ्या तात्काळ सुरू न झाल्यास माखजन बसस्थानकात आंदोलन छेडू, असा इशारा माखजनचे सरपंच महेश बाष्टे यांनी दिला आहे.
देवरूख आगाराकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील माखजन आरवली बसफेऱ्या पूर्वी प्रमाणे कार्यान्वित केल्या जात नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत असल्याचे महेश बाष्टे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. देवरुख आगाराकडून माखजन बसस्थानकातील अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. माखजन बसस्थानकातून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्या पुन्हा पूर्ववत कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना देखील याकडे देवरुख आगाराने दुर्लक्ष केले आहे. या साऱ्याचा फटका वयोवृध्दांसह रूग्णांना बसत आहे. माखजन बसस्थानक म्हणजे सध्या गैरसोयीचे आगार असल्याचे चित्र आहे. पूर्वीच्या मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी एसटी गाड्या कायम चालू ठेवण्यात देखील देवरुख आगाराला सपशेल अपयश आले आहे. भारमान असून देखील आरवली माखजन एसटी बस फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांना उन्हातान्हातून अनेक तास ताटकळत उभे रहावे लागत आहे.
आरवली-माखजन एसटी बसफेऱ्या सुरू न झाल्यास माखजन बसस्थानकात सर्वपक्षीय आंदोलन करू, असा इशारा महेश बाष्टे यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 02/Dec/2024














