खेड : तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप बालभवन, श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव प्राथमिक विभाग, कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव माध्यमिक विभाग व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर उच्च माध्यमिक विभागामधील विद्यार्थ्यांचं ‘स्नेहगंध २०२४’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभाने समारोप झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनती ऑरगॅनिक्सचे जनसंपर्क अधिकारी सचिन खरे उपस्थित होते. भडगाव-खोंडे ग्रुप ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिवाकर प्रभ. एच. एस. सी. बोर्ड अभ्यासक्रम मंडळ पुणेचे पुस्तक लेखन सदस्य अनिल कापरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी होते. यावेळी सचिन खरे यांच्याहस्ते बाल ज्ञानदीप व ज्ञानदीप चित्रसंग्रह या वार्षिक हस्तलिखित व चित्रसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्या नंतर प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. भोंडला स्पर्धेत गटनिहाय प्रथम क्रमांकप्राप्त पहिली ते चौथी गटातून इयत्ता दुसरी, पाचवी ते सातवी गटातून इयत्ता सहावी, आठवी ते दहावी गटातून इयत्ता दहावी, इयत्ता अकरावी गटातून अकरावी नीट आणि इयत्ता बारावी गटातून बारावी वाणिज्य या वर्गातील विद्यार्थ्यांचे तसेच दिवाळी सुट्टीपूर्वी आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेमध्ये पहिली ते चौथी गटातून इयत्ता तीसरी व पाचवी ते सातवी गटातून इयत्ता पाचवी या वर्गातील विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलींच्या दोन्ही संघांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्यांचे यावेणी सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 02/Dec/2024














