सावर्डे : मणक्यातील सरकलेल्या चकतीतील पेशी प्रयोगशाळेत वाढवून त्याचे प्रत्यारोपण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात वालावलकर रुग्णालयाला यश आले. भारतात प्रथमच हा प्रयोग या रुग्णालयात करण्यात आला. डॉ. सुनील नाडकर्णी, अस्थिरोगतज्ज्ञ आणि डॉ. ऋता मुल्हेरकर (शास्त्रज्ञ) यांनी एकत्रितरीत्या चकतीतील पेशी प्रत्यारोपण करण्याचे अवघड तंत्र विकसित केले आहे.
माणसाच्या मणक्यामधील दोन हाडांमध्ये असलेल्या चकतीची वयोपरत्वे झीज होऊन त्याच्या आतील पेशींनी बनलेला भाग बाहेर येऊन लगतच्या मज्जातंतूंना सुरळीत कार्य करण्यास अडथळा निर्माण होतो वा त्याचा दाब पडतो. त्याचा परिणाम असहाय्य अशा पाठ व कंबरदुखीमध्ये होतो. वाढणाऱ्या वयाव्यतिरिक्त बदललेली जीवनशैली, संगणक व मोबाईल फोनचा अतिरिक्त वापर तसेच पेशीमध्ये होणाऱ्या जैविक बदलांमुळे चकतीची झीज होण्याचा वेग वाढतो.
चकतीची झीज झालेल्या रुग्णांना अंतिम पर्याय म्हणून एंडोस्कोपि, डिस्केक्टमी (दुर्बिणीद्वारे) ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेदरम्यान चकतीचा बाहेर आलेला भाग (हर्निएशन) काढला जातो, त्यायोगे मज्जातंतूंच्या कार्यातील अडथळा दूर होऊन रुग्णाची वेदना कमी होते.
डॉ. सुनील नाडकर्णी, अस्थिरोगतज्ज्ञ आणि डॉ. ऋता मुल्हेरकर (शास्वज्ञ) यांनी एकत्रितरीत्या चकलीतील पेशी प्रत्यारोपण करण्याचे अजचंड तंत्र विकसित केले आहे. यामध्ये एंडोस्कोपिक डिस्वेक्टमीदरम्यान चकतीच्या उतीचा भाग (टिश्यू) घेतला जातो. टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाने रुग्णांच्या चकतीतील पेशी शरीराबाहेर प्रयोगशाळेत वाढवून त्यांची गुणवत्ता पडताळून पुन्हा त्याच रुग्णाच्या चकतीमध्ये प्रतिरोपित केल्या जातात. हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच विकसित केले जात आहे. फेज १ ची ट्रायलअंतर्गत पहिल्या रुग्णामध्ये चकतीतील पेशींचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.
पाठदुखीसाठी ‘सेलथेरपी’ संशोधन
भविष्यात रुग्णांना याचा निश्चित लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. हे उपचार म्हणजे ‘सेल रिजनरेटिव्ह थेरपी’ या विषयातील एक नावीन्यपूर्ण संशोधन असून, पाठदुखीसाठी ‘सेलथेरपी’ संशोधनाने या विषयातील शोध आणि उपचाराचे नवीन दालनच उघडले आहे. “समर्थकृपा लाईफ सायन्सेस” या कंपनीने निर्माण केलेल्या तंत्राचा आर्थिक भार श्री. विठ्ठलराव जोशी बॅरिटीज ट्रस्टने उचलला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 02/Dec/2024














