गेल्या काही दिवसांत अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिल्या आहेत. आणखी एका अभिनेत्रीने आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या नुकतीच आई झाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच श्रद्धाने गरोदर असल्याचं सांगत चाहत्यांना खूशखबर दिली होती. आता अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
श्रद्धाने २९ नोव्हेंबर(शुक्रवारी) तिच्या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत श्रद्धाने तिच्या जुळ्या मुलांची झलक दाखवली आहे. श्रद्धाला कन्यारत्न आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. “दोन चिमुकल्यांनी आमचं कुटुंब पूर्ण केलं. आमचं हृदय आनंदाने भरुन गेलं आहे”, असं कॅप्शन श्रद्धाने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 03-12-2024














