रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅसचा वापर; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील कशेळी फाटा येथे रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस वापरल्या प्रकरणी महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कशेळीफाटा येथे निसर्ग रेस्टॉरंट येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने तिच्याकडे रेस्टॉरंट चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना त्यामध्ये घरगुती वापराचा एचपी कंपनीचा गॅस वापरला. या प्रकरणी फिर्यादी राकेश श्रीकृष्ण विलणकर (वय ४९) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अन्न सुरक्षा माणके कायदा २००६ चे कलम ३१ (१) सहवाचन कलम २६, ६३, जिवनावश्यक वस्तु कायदा कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 04-12-2024