रत्नागिरी शासकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची नोटीस

रत्नागिरी : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काही महिन्यांपूर्वी देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवून पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती. मात्र, राज्यातील 20 वैद्यकीय महाविद्यालयांनी आयोगाला ही माहिती न दिल्याने तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, असा प्रश्न विचारणारी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया देखील समावेश आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काही महिन्यांपूर्वी देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवून पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येण्राया विद्यावेतनाची माहिती मागितली होती. मात्र, राज्यातील 20 वैद्यकीय महाविद्यालयांनी आयोगाला ही माहिती न दिल्याने तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, असा प्रश्न विचारणारी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. त्यात ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयासह 11 शासकीय, तर 9 खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे.

वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आयोगाकडून देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येणाऱया विद्यावेतनाची माहिती मागितली होती. त्यानुसार देशभरातील 198 वैद्यकीय महाविद्यालयांनी माहिती दिलेली नाही. त्यात राज्यातील 20 कॉलेजांचा समावेश आहे. त्यामुळे आता आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.

नोटीस बजावण्यात आलेली शासकीय महाविद्यालयांमध्ये धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार या महाविद्यालयांचा समावेश आहे.

तसा नोटीस बजावण्यात आलेली खासगी महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तळेगाव, एन.के.पी. साळवे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल एज्यु.अँड रिसर्च सेंटर नागपूर, ए. सी. पी. एम. मेडिकल कॉलेज धुळे, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ, महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज वाशी, परभणी मेडिकल कॉलेज परभणी, डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती, प्रकाश इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल अँड रिसर्च सांगली या वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 04-12-2024