रत्नागिरी ः लोकनेते शामराव पेजे स्मृती न्यास, रत्नागिरीतर्फे प्रतिवर्षी बारावी पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
यावर्षी शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम २२ डिसेंबरला कुणबी भवन येथे सकाळी ११ वा. होणार आहे. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण यांच्या अध्यक्षतेखाली व कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष रामभाऊ गराटे ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
आतापर्यंत या न्यासातर्फे ३ हजार ४५८ विद्यार्थांना ५६ हजार ४७ हजार एवढी रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून प्रदान केली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत ८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, १ लाख ७२ हजार शिष्यवृत्ती म्हणून खर्च केली जाणार आहे. शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 13-12-2024