चिपळूण : चिपळूणजवळ दळवटणे येथे छत्रपती शिवरायांचा एक महिना मुक्काम होता. त्यांची एक छावणी होती. कोकणभूमीला हा मान प्राप्त झाला, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. शिवरायांची आजही कोकणी माणसाची निष्ठा अशी आहे की, त्या जागेला आजही कोणी कुदळ फावडे लावत नाही. छत्रपती शिवरायांचे पाय जेथे लागले ती जागा पवित्र, ही त्या मागची भावना आहे; मात्र हा इतिहास आपल्याला किती माहिती आहे तो जपायचा आहे, अशी भावना लोटिस्मा कार्याध्यक्ष धनंजय वितळे यांनी व्यक्त केली.
चितळे म्हणाले, आम्ही संग्रहालय पुन्हा उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याला साठे सर यांचे नावही देणार आहोत. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या योगदानामुळे हा इतिहास जगवण्यासाठी पाठबळ मिळणार आहे दळवटणे येथे छत्रपती शिवायरांचा तळ असलेल्या छावणीचा देखावा लेसर शोद्वारे या संग्रहालयात उभा करावयाचा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराने उत्तम संग्राहलय उभारले होते. कोकणाबाबत आपल्यालाच कमी माहिती असते. कोकणचा संपन्न इतिहास, भूगोल आणि कोकणची उतुंग माणसे यांची माहिती होण्यासाठी या संस्थेने संग्रहालय उभारले; मात्र २००५ आमि २०२१ ला आलेल्या महापुराने त्याची मोठी हानी झाली; मात्र आम्ही ते आता पुन्हा उभारणार आहोत, सातवाहन काळातील जाते या संग्रहालयाकडे आहे. पिनकोडचा जन्मदाता हा माखजनमधील वेलणकर आहेत: परंतु याची आपल्याला माहितीय नसते. ती लोटिस्माच्या कलादालनात मिळेल. त्यासाठी येथे कोकणातील भव्य व्यक्तीमत्वांचे तैलचित्रांचे दालन उभारले आहे.
लोटिस्माचे प्रकाश देशपांडे म्हणाले की, एकशेसाठ वर्षापूर्वी काशीकर यांनी चारजणांना घेऊन ग्रंथालय सुरू केले. आज त्याचे रूप भव्य झाले आहे. सातवाहन काळातील जाते मिळाले म्हणजे सातवाहन काळक्षठका जुना इतिहास कोकणाला आहे. संग्रहालयात अश्मयुगीन हत्यारे आहेत. डाळीएवढे सोन्याचे नाणे आहेत. लोकमान्यांचे पत्रही होते. कोकणात काय विलक्षण लोक होऊन गेले हे ज्ञात व्हावे म्हणून ही तैलचित्रं उभारत आहोत. खुदीराम बोस यांच्यासारख्यांना बॉम्य बनवून देणारा गणेश आठल्ये नावाचा क्रांतिकारक पश्चिम बंगालमधील बंगलात गेला; त्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे.
पुरातन जात्यात तुळशी वृंदावन !
पुरातन वस्तू कशा मिळतात वा जमवाव्या लागतात याबद्दल देशपांडे यांनी मिश्किल उदाहरण दिले, देशपांडे म्हणाले, नव्या भैरीजवळ पुरातन म्हणजे सातवाहनकालीन जाते आहे, ही माहिती कळली होती. ते आणण्यासाठी उचलावला आम्ही गेलो तेव्हा तेथील एक वृद्धा आली. ती म्हणाली, जातं उचलायचं नाही. मला त्यात तुळस लावायची आहे. आम्ही त्यांना म्हटले, तुम्हाला तुळसच हवी आहे मग तुम्हाला पूर्ण नवीन वृंदावन देतो. त्यावर जाते देण्यास त्या तयार झाल्या. संग्रहालयात पुरानन रांजण, समयाही आहेत; मात्र हे सारे जमवणे ही खर्चिक बाब आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 13/Dec/2024