खेड : जगबुडी नदीपात्रात कोसळला टँकर

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाकानजीक बुधवारी (दि.१८) पहाटे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर नदीपात्रात कोसळून मोठा अपघात झाला. चालकाला झोप अनावर झाल्याने टँकरवरील त्याचे नियंत्रण सुटले व दोन पुलांच्या मधून टँकर थेट नदीत कोसळला.

सुदैवाने अपघातात टँकर चालक बचावला आहे. हा टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. खेड तालुक्यातील भरणे नाकानजीक जगबुडी नदीवरील पुलाजवळ आल्यानंतर टैंकर चालकाला झोप अनावर झाल्याने टँकरवरील त्याचा ताबा सुटला. टँकर नदीत कोसळताना चालकाने (नाव समजू शकले नाही) लगेच उडी मारल्याने तो यातून बचावला. मात्र टँकर दोन पुलांच्या मधून उभाच सरळ खाली नदी पात्रात कोसळल्याने टँकरचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 20/Dec/2024