रत्नागिरी : रस्ता ओलांडताना दुचाकीला धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून रस्ता ओलांडताना दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वा. सुमारास रामनाका ते रामआळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली होती. निलेश प्रकाश हेबाळकर (४६, रा. अभ्युदय नगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. नीलेश हेबाळकर आपल्या ताब्यातील हुंडाई कार (एमएच-०८-एएन-१७४८) घेऊन एसटी स्टँडमार्गे रामनाका येथील रस्ता क्रॉस करुन रामआळीत जात होता. रामआळीत जात असताना त्याने दोन्ही बाजूस पाहून त्यानंतर पुढे जाणे आवश्यक होते. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे आणि हयगयीने आपली कार चालवून रस्ता ओलांडताना पुढील दुचाकी (एमएच-०८-एए-२२१६) ला जोराची ठोकर देऊन त्यापुढे घासत नेले. यात दुचाकीवरील इम्तियाज बोरकर व त्याच्या मागे बसलेला शैबाज फणसोपकर यांना दुखापत होउन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 20/Dec/2024