रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे राहत्या घरी विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाला.
विद्या विजय आग्रे (४१, रा. गोळप धोपटवाडी, रत्नागिरी) असे महिलेचे नाव आहे. तिने राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले होते. ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील सी.पी. आर. रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना १२ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 20/Dec/2024













