चिपळूण : वालावलकर रुग्णालयात फिजिओथेरपीतील पदव्युत्तर अभ्यासक्रम

सावर्डे : डेरवण (ता. चिपळूण) येथील कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात फिजिओथेरपी या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे. महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाने पाच विषयात उच्च पदवी शिक्षणास मान्यता दिली आहे. कोकणात फिजिओथेरपीमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही पर्वणी आहे.

कोकणात डेरवण येथे प्रथमच २०१९ ता वालावलकर हॉस्पिटलने बॅचलर इन फिजिओथेरपी हा महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असा पद‌वी अभ्यासक्रम सुरू केला. दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश देऊन त्यांना उत्तम शिक्षण आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसे प्रात्यक्षिक देण्याची व्यवस्था केली. आजपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर अशा विविध भागांतील फाउंडेशन बेंचमधील ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हेच शिक्षण आता वालावलकर फिजिओथेरपी कठिजमध्येच उपलब्ध व्हावे आणि त्याचा फायदा कोकणातील रुग्णांना व्हावा याकरिता संस्थेला पाच विषयांत उच्च पद‌वी अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता विद्यापीठाने दिली आहे. त्यात मस्कुलोस्केलेटल (अस्थिरोग, स्नायू आणि सांथे), न्यूरोफिजिओथेरपी (मज्जासंस्था आणि मेंदूमुळे उद्भवणारे अपंगत्व), हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (खास इद्यरोगासाठी) फिजिओथेरपी, कम्युनिटी-बेस्ड फिजिओथेरपी (समुदायामध्ये आरोग्य आणि कल्याण), स्पोर्ट्स फिजिओथेरपी या पाच विषयांची मान्यता प्राप्त झाली आहे. दहा उच्चशिक्षित एमपीटीइन फिजिओथेरपी अध्यापक, १८ पीजी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केले आहेत. या उपक्रमाची सुरुवात २२ नोव्हेंबरला करण्यात आली आहे.

या सुविधा दिल्या जाणार
मास्टर्स डिग्रीचे अभ्यासक्रम दोन वर्षाचे असून, त्यात उपचारकौशल्य आणि संशोधनावर विशेष भर दिला जाणार आहे. याकरिता सुसज्ज वर्गखोल्या, स्मार्ट बोर्ड टीचिंग, प्रशिक्षणासाठी उच्च दर्जाचे सिम्युलेटर, बायोमेलानिकेल गेट लॅब फॅसिलिटी, मुव्हमेंट डिसऑर्डरच्या पृथक्करणाची सोय, क्लिनिकल अॅप्लिकेशन, बाह्यरुण विभागात हृदयरोग पुनर्वसनासाठी कार्डियाक फिटनेस केंद्र, अशा सोयींनीयुक्त असे हे दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 20/Dec/2024