कडवई : कडवई-तुरळ रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू केल्याने रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात केली.
हे खड्डे वेळेवर न बुजवल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थ व वाहनचालक यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण होते. या संदर्भात कडवई ग्रामपंचायतीची मासिक सभा घेण्यात आली. या सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. नुकतेच खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले. उजगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुधीर कांबळे व कनिष्ठ अभियंता अक्षय बोरसे उपस्थित होते. येत्या पंधरा दिवसांत कार्पेट सिलकोटचे काम पूर्ण करण्यात येईल. खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कामाची पाहणी माजी सरपंच संदेश सागवेकर, अक्षय यादव, अनंत चोपडे, अमित साळुंके यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 20/Dec/2024













