मंडणगड : परभणी घटनेतील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्याची रिपाइंची मागणी

मंडणगड : परभणी येथील घटनेतील दोषी व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्यावी. तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमानुष मारहाणप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने जोरदार निषेध मोर्चा काढला. मोचर्चादरम्यान निदर्शन व जय संविधानच्या घोषणांनी मंडणगड शहर दणाणून गेले. आंदोलकांनी तहसील आवारात ठिय्या आंदोलन केले.

शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आरपीआयच्या कार्यकत्र्यांनी मोर्चाला सुरुवात केली. शहरापासून से तहसील कार्यालयापर्यंत सुरू असलेल्या मोर्चात आंदोलकर्त्यांनी परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली.

तहसील कार्यालयामोर मोर्चा आल्यानंतर आंदोलकर्त्यांनी तहसीलच्या पटांगणात ठिय्या दिला. आरपीआयचे राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके यांनी याबाबत कार्यवाही न झाल्यास आणखी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले. तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेतली. तहसीलदारांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले.

या मोर्चामध्ये आरपीआपचे राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चडे, जिल्हाध्यक्ष प्रीतम रूके, जिल्हा सरचिटणीस नगरसेवक आदेश मर्चडे, तालुकाध्यक्ष नागसेन तांबे, तालुका सचिव रामदास खैरे, किरण पवार, संदेश खैरे, विजय खैरे, जितेंद्र जाधव, भगवान खरे, शंकर पवार, विनोद कवडे, संकेत तांब, आदी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर आमचे सर्वस्व
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करून डॉ. बाबासाहेब आमचे सर्वस्व असून हजारो, लाखो वेळा डॉ. बाबासाहेव आंबेडकर असे बोलणारच, असे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 20/Dec/2024