रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवाची खातू नाट्यमंदिरात गीतगायन, नृत्य स्पर्धा आणि बक्षीस वितरणाने सांगता झाली. आदर्श विद्यार्थी पुरस्कार बारावी विज्ञानचा विद्यार्थी सारंग जोशी याला, तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार बारावी विज्ञानची विद्यार्थिनी तीर्था मांजरेकर हिला आणि महाविद्यालयातील अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार वरुण दुदगीकर यांना प्रदान करण्यात आला.
फूड फेस्टिव्हलमध्ये विविध पदार्थाची रेलचेल होती. या दिवशीचा घंटानाद सन्मान हरेश केळकर यांना प्रदान करण्यात आला. एनएसएसच्या माजी स्वयंसेवकांकडून दिला जाणारा आदर्श स्वयंसेवक पुरस्कार यंदा बारावी कला वर्गातील स्वरा पाटणकरला प्रदान करण्यात आला. बक्षीस वितरणासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, सचिव सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, राजन मलुष्टे महेश नाईक, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, दिलीपकुमार शिंगाडे, शिल्पा तारगावकर इंदोत्सवे प्रमुख वैभव कानिटकर, आदी मान्यवर उपस्थित होते. समारोपाच्या दिवश छंदोत्सवातील विविध समित्या प्रमुखांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा उत्तम कामगिरीबदल गौरव करण्यात आला. छंदोत्सवातील सर्व कार्यक्रमांचे यशस्वी
आयोजन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सर्व स्पर्धांसाठी अनिल सागवेकर, उदय लिंगायत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धाचा निकाल असा
चित्रकला ऋषभ कोतवडेकर, यश चव्हाण, आर्यन आयरे. रांगोळी स्पर्धा प्रथम ऋतुजा मेस्त्री, धनश्री गराटे, द्वितीय रिया जाधव, भक्ती आंबेकर, तृतीय संतोषी दमाई, दिक्षा संकपाळ, शैक्षणिक रांगोळी स्पर्धा प्रथम स्मरणिका दळी, श्रावणी सावंत, द्वितीय ईशा पालकर, दिक्षा चव्हाण, तृतीय सानिया पाटील, मधुरा बेडबे, छायाचित्र स्पर्धा ऐश्वर्या सावंत, ऋषिकेश कोतवडेकर, तन्वी पालकर, पर्यावरण मंडळ आयोजित छायाचित्र स्पर्धा चिन्मय मुळ्ये, आयुष सनगरे, शिवराज विचारे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा स्वरदा केळकर, संतोषी दमाई, चिन्मयी खेडेकर,
गायन स्पर्धा अनया वाडेकर, चिन्मय साखरकर, हर्ष बोंडाळे, नृत्य स्पर्धा एकल नृत्य आभा साखळकर, अक्षता थोरात, शर्वरी मसुरकर, युगुल नृत्यप्रकार लक्षवेधी सादरीकरण म्हणून स्मृती सावंत आणि परीणिता घाणेकर, समूहनृत्य आई एकवीरा ग्रुप, कलासार्थ ग्रुप, हिपहॉप ग्रुप. स्पर्धेसाठी रूपाली फडके, डॉ. अशोक आखाडे यांनी परीक्षकाचे काम पाहिले. रिल मेकिंग स्पर्धा प्रणय चव्हाण, हर्षद राजापकर, ज्ञानल धामणस्कर.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 20/Dec/2024













