रत्नागिरी : विकलेल्या दुचाकीची कागदपत्रे न दिल्याने लोखंडी सळईने मारहाण

रत्नागिरी : दुचाकी विकल्यानंतरही त्याची कागदपत्रे न दिल्याच्या रागातून एकाला सहाजणांना लोखंडी सळई जबर मारहाण केली. ही घटना गुरुवार १९ डिसेंबर रोजी सायंकाळी मांडवी ते पेठकिल्ला जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

अझर, रफिक आणि अन्य चार अज्ञात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दाउद सईद दर्वे (वय ३७, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, त्यांच्या मुलाने त्याची स्कुटी संशयित आरोपी अझर आणि रफिकला विकली होती. परंतु, त्याची कागदपत्रे दिली नव्हती. यातून त्यांच्यात पूर्वी वाद झाले होते. गुरुवारी सायंकाळी फिर्यादी दाउद दर्वे हे पत्नीसह दुचाकीवरुन घरी जात हाते. तेव्हा या सहा संशयितांनी फिर्यादीला थांबूवन त्यांच्या डोक्यात व हातांवर लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकीही दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 21/Dec/2024