रत्नागिरी : तब्बल १० टन वजनाचे अॅल्युमिनियमचे सामान गुजरातला मागवून घेत त्याचे २६ लाख ५५ हजार रुपये न देता फसवणूक केली. ही घटना २५ जून २०२४ रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास एमआयडीसी मिरजोळे येथे घडली आहे. या प्रकरणी अमित (रा, अहमदाबाद, गुजरात) पूर्ण नाव पत्ता माहिती नाही. याच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात व्यंकटेश श्रीपत गुरव (५३, रा. मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी, रत्नागिरी) यांनी गुरुवार १९ डिसेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, २५ जून रोजी आरोपी अमितने फिर्यादी व्यंकटेश गुरव यांना फोन करून १० टन वजनाचे अॅल्युमिनिमचे इनगॉट मागवले. त्याच्यावर विश्वास ठेऊन गुरव यांनी त्याच दिवशी संध्याकाळी मिरजोळे शालिनी मेटल्स इंडस्ट्रीज येथून रुतवा कार्गो मुव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (जी-जे-२७-टीडी-५३०४) मधून तो माल अहमदाबाद गुजरातला पाठवून दिला. मात्र, आरोपीने अद्याप त्याचे पैसे न दिल्याने फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 21/Dec/2024












