दापोली : भोपण खाडीतील वाळू उपशाबाबत महसूल विभाग ‘अॅक्शन मोडवर’

दापोली : दापोली तालुक्यातील भोपण खाडीतील वाळू उपशाबाबत दापोली महसूल विभाग अॅक्शन मोडवर आला असून १८ रोजी महसूलचे एक पथक भोपण येथे तळ ठोकून होते. मात्र असे असले तरी या खाडीत वाळू उपसा करणारी बोट अजूनही आहे. त्यामुळे भोपण खाडीतील बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल विभागाने नेमकी काय कारवाई केली याबाबत कळू शकले नाही.

गेल्या आठ दिवसांपासून दापोली भोपण खाडीत वाळू माफियांनी आसरा घेऊन शेकडो ब्रास वाळूची चोरी दिवसाढवळ्या केली आहे. हे वाळू माफिया महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची पाठ फिरली की बिनधास्त वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांवर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी माहिती देताना सांगितले.

या वाळू उपशामुळे या खाडीतील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे दापोली महसूल विभाग वाळू माफियांवर नेमकी काय कारवाई करते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 21/Dec/2024