झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेत अंत्यसंस्कार

न्यूयॉर्क : प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन यांच्या पार्थिवावर अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील स्मशानभूमीत गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी तिथे ख्यातनाम तालवाद्यवादक ए.

शिवमणी व इतर कलाकारांनी ड्रम वाजवून झाकीर हुसेन यांना आगळी श्रद्धांजली वाहिली.

झाकीर हुसेन यांचे सॅनफ्रॅन्सिको येथील रुग्णालयात सोमवारी उपचारादरम्यान निधन झाले. ते इडिओपथिक पल्मनरी फायब्रोसिस या फुप्फुसाच्या विकाराने आजारी होते. निधनसमयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्यांच्यावर सॅनफ्रॅन्सिस्को येथील फर्नवूड स्मशानभूमीत अंतिम संस्कार झाले. त्यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो लोक उपस्थित होते. ए. शिवमणी यांनी सांगितले की, ताल हा देव असून उस्ताद झाकीर हुसेन हे त्याचे मूर्तिमंत रुप आहे. १९८२ सालापासून त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकलो. जेव्हा कधी कोणताही ताल ऐकतो त्यावेळी झाकीर हुसेन यांची आठवण येते. (वृत्तसंस्था)

झाकीर यांना चार वेळा मिळाला ग्रॅमी पुरस्कार

– गेल्या सहा दशकांच्या तबलावादन कारकिर्दीत झाकीर हुसेन यांना चार वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.

– त्यांच्यामागे पत्नी ॲन्टोनिया मिनेकोला तसेच अनिशा कुरेशी, इझाबेला कुरेशी या दोन सुकन्या असा परिवार आहे.

– त्यांना भारत सरकारने १९८८ मध्ये पद्मश्री व २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

– प्रख्यात सतारवादक रविशंकर यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय गायक व वादकांसोबत त्यांनी जगभरात कार्यक्रम केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 21-12-2024