रत्नागिरी : चाँदसूर्याजवळ अर्धा तास वाहतूक अचानक बंद ठेवल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे सध्या काम युद्धपातळीवर सुरु आहे. परंतू ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका हा सर्वसामान्य नागरिक तसेच वाहनचालकांना बसत आहे. शुक्रवारी सकाळी तब्बल अर्धा तास चाँदसुर्या जवळ वाहतूक थांबवून ठेवण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी कामानिमित्त शासकीय तसेच खासगी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.

जिल्ह्यात सध्या रस्त्यांची कामे जोरदार सुरु आहेत. यामध्ये मुंबई गोवा महामार्ग तसेच नागपूर-मिऱ्या महामार्गाचे कामांचा समावेश आहे.

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. परंतू काही ठिकाणी ठेकेदारांनी काम करताना योग्य काळजी न घेतल्याने त्याचा फटका वाहनचालक तसेच नागरिकांना बसत आहे. धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गचे साळवी स्टॉप ते हातखंबा हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे या महामार्गावर वाहतूकही मंदावली आहे. शुक्रवारी सकाळी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका वाहनचालक तसेच नागरिकांना सहन करावा लागतो. चाँदसूर्याजवळ माती टाकण्याच्या बहाण्याने तब्बल अर्धा तास वाहतूक बंद ठेवण्यात आली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. तब्बल अर्धा तास रस्ता बंद ठेवल्याने नागरिक, वाहनचालकांचे हाल झाले. शासकीय कर्मचारी, खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची कार्यालयात येण्यासाठी धावपळ होती. वाहतूक बंद असल्याने हे कर्मचारी रस्त्यातच अडकले होते. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा फटका बसला.

श्वसन आजाराचे रुग्ण वाढले
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे साळवी स्टॉप ते हातखंबा हे काम जोरात सुरु आहे. खोदाई केल्याने धुळीचे साम्राज्य सगळीकडे पसरले आहे. ठेकेदार योम्पपद्धतीने पाणी न मारत असल्याने या धुळीचे प्रमाण जास्त होऊ लागले. शेवटी याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील नेहमी ये-जा करणाऱ्यांना श्वसनाचे आजार वाढले आहेत. विशेषकरून खोकल्याचे प्रमाण जास्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 21/Dec/2024