संगमेश्वरातील पोलिस पाटलांचे रखडलेले मानधन अखेर मिळाले

माखजन : मे महिन्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात मराठा आरक्षणा अंतर्गत शासकीय सर्व्हे, पोलिसपाटलांकडून करण्यात आला होता. कामाचे ठरलेले मानधन पोलीस पाटलांना ६ महिने उलटले तरी संगमेश्वर तहसील कार्यालायकडून मिळाले नव्हते, या विषयीची बातमी नुकतीच प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत संगमेश्वर तहसील कार्यालयाकडून पोलिसपाटलांना मोबदला अदा करण्यात आला आहे. मराठा आरक्षण सर्व्हेचे काम शिक्षकांनी नाकारल्यावर हे काम पोलिसपाटील, काही गावात अंगणवाडी सेविका यांच्यावर सोपवण्यात आले होते. पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांनी वेळेत काम पूर्ण केले. परंतु ठरलेले मानधन मिळण्यासाठी संगमेश्वर तहसीलदार कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत होते. प पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या हक्काचे मानधन मिळावे. या वृत्ताची तत्काळ दखल घेऊन तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांचे मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे मानधन अदा केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 21/Dec/2024