राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा पूर्ववत

राजापूर : माजी केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने अचानक बंद केलेले राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची आरक्षण सेवेबाबत होणारी गैरसोय दूर झाली आहे.

माजी खासदार प्रभू यांनी यामध्ये लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह अधिकारी वर्गाशी संपर्क साधून कोकण रेल्वेच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीची माहिती दिली. ना. प्रभूनी मांडलेल्या भूमिकेनंतर कोकण रेल्वे प्रशासनाने तो निर्णय रद्द केला आणि राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा केंद्र सुरू झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 21/Dec/2024