चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी जे. महाविद्यालय रसायनशास्त्र विभाग आयोजित महाविद्यालयामध्ये करिअर इन केमिकल इंडस्ट्री या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये रासायनिक उद्योग क्षेत्रातील विविध करिअर पर्यायांची माहिती देण्यात आली.
रासायनिक अभियांत्रिकी, रासायनिक तंत्रज्ञान, रासायनिक उत्पादने आणि रासायनिक संशोधन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधींबद्दल चर्चा झाली. केमिकल इंडस्ट्री हा फक्त एक कामाचा भाग नाही, तर ज्ञान आणि अनुभवांच्या जोडीने एक उत्कृष्ट करिअरची वाट आहे. डी. बी जे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, सध्या सिंजेंटा प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील एच.एस.ई. विभागामध्ये ऑडिटर म्हणून कार्यरत असणारे जगदीश पिंपुटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. एस. बापट उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. उदय बामणे, प्रा. विवेक जाधव, प्रा. प्राजक्ता पिसे, प्रा. तेजल गुरव, प्रा. करिश्मा सागवेकर आणि प्रा. अनुष्का कुलकर्णी, प्रयोगशाळा सहाय्यक संतोष वाजे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे नियोजन रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. के. जाधव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 21/Dec/2024












