देवरुख : शहरातील विज्ञान सेंटरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी भेट देवून या सेंटरच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, रेन ट्री फाऊंडेशनच्या लिना दांडेकर, नमिता दांडेकर, स्वानंद दामले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सेंटरमधील फन सायन्स हॉल, इनोव्हेशन सेंटर यामधील प्रदर्शन, कामकाजाद्वारे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञान विषयक मार्गदर्शन केले जाते याची माहिती दिली.
उपस्थित अधिकाऱ्यांना सायन्स सेंटरची संकल्पना आवडली आणि येत्या काळात प्राथमिक तसेच इतर विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे वचन त्यांनी दिले. सेंटरबाबत माहिती कैलास मोंडे, विवेक पवार यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 21/Dec/2024












