रत्नागिरी : येथील नाट्यलेखक विजय साळवी यांच्या एक चंद्रकोर या नाटकाला आजरा (कोल्हापूर) येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचा (कै.) दाजी टोपले नाट्यलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.
रोख पाच हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री. साळवी यांनी आजपर्यंत दहा नाटके लिहिली असून, त्यांच्या टार्गेट या नाटकाला पाच राज्यस्तरीय व चंद्रकोर नाटकाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. सम्राट या एकांकिकेला दादरच्या अमर हिंद मंडळाचे राज्यस्तरीय लेखन पारितोषिक प्राप्त झाले आहे. चौसोपी वाडा हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित असून त्यांची नाटके राज्यातील विविध केंद्रांवरून राज्यनाट्य स्पर्धेसाठी सादर होत असतात. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल वाचक, कलाकारांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 21-12-2024












