चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक असुर्डे येथे मुंबईवरून गोव्याकडे जाणारी गाडी दरीत कोसळली तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी 10.30 वाजता झाला आहे. सावर्डे येथील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असूनअधिक तपास करीत आहेत ग्रामस्थांच्या मदतीने कार मध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णांना डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 21/Dec/2024












