चिपळूण : कोकणात बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय सकारात्मक घेऊन बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही हिवाळी अधिवेशनादरम्यान दिली.
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अभ्यासु आमदार शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात कोकणातील अनेक विषयांवर मुद्दे मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. यामध्ये बांबू लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, असे निवेदन केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शेखर निकम यांच्या या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करताना शेतकऱ्यांकरिता दोन हेक्टर जागेत टिशू कल्चर बांबू रोपे व संरक्षण देखभालीसाठी १७५ रुपये प्रती बांबू रोप अनुदान तीन वर्षात तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना उत्तम रोजगाराचा पर्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे आमदार निकम यांनी या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधून या विषयाला चालना दिल्याबद्दल निकम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तसेच जमीन तुकडा संदर्भात देखील निकम यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात देखील कायदा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 21-12-2024












