रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) आयुष प्रसन्न सुर्वे याला मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त झाले आहे.
दि. १६ व १७ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठ आणि डी. ए. व्ही महाविद्यालय, भांडूप, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील आयुष प्रसन्न सुर्वे (एस. वाय. बी. ए.) या विद्यार्थ्याला ८५ कि. वजनी गटात कांस्य पदक प्राप्त झाले. त्याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयुष याचे रत्नागिरी एज्यु. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 21-12-2024
