Breaking : पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व व्यापारावर घातली बंदी, हवाई क्षेत्रही बंद; नेमके काय घेतले निर्णय, वाचा सविस्तर..

भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्याने पाकिस्तानची शेती करपून जाणार आहे. तसेच प्रचंड दुष्काळ पडणार आहे. यामुळे आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था भीषण होणार आहे. यावरून पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती.

या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताने पाकिस्तान या दहशतवाद्यांना लाँचिंग पॅड, शस्त्रे उपलब्ध करून देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आयएसआय या दहशतवाद्यांमागे असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सिंधु नदीचे पाणी रोखण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानी राजदुतांनाही आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानने देखील पाऊले उचलली आहेत.

पाकिस्तानच्या एनएससी बैठकीत भारताने अद्याप दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिलेले नाहीत, असे म्हटले आहे. तसेच पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखीच कारवाई असल्याचा आरोप केला आहे. भारत हवाई हल्ला करू शकतो, यामुळे भारतीय प्रवासी विमानांना ये-जा करण्यासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचबरोबर पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व व्यापारावर बंदी घातली आहे.

Gadre2

दरम्यान, भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाकिस्तानींना देखील भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. २९ एप्रिलनंतर मेडिकल व्हिसादेखील कार्यरत राहणार नाही, असे सांगितले आहे. इतर प्रकारचे व्हिसा २७ एप्रिलपासूनच रद्द होणार आहेत. एकंदरीतच भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 24-04-2025