दापोली : कोकणात या आठवड्यात अचानक थंडीत वाढ झाली आहे. हा थंडीचा तडाखा अजून काही दिवस कायम राहणार आहे; मात्र यामुळे आंबा व काजू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने वर्तवली असून, यासंदर्भात बागायतीची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
याबाबत कृषी विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. कोकणामध्ये वाढलेली थंडी पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता आहे तसेच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनारपट्टीनजीक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील काही कालावधीसाठी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हिमालयीन प्रदेशामध्ये पश्चिमी अशांतता ता सक्रिय असल्याने दक्षिण भारतामध्ये वाढलेल्या थंडीचा तडाखा जाणवत आहे. हा तडाखा काही दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा पिकावर करपा रोगाला तसेच तुडतुडे आणि फुलकिडी यांचा प्रायुर्भात होण्याची शक्यता आहे. यासाली बागेची वारंवार पाहणी करून आवश्यकता वाटल्यास विद्यापीठाने शिफारशी केलेल्या पालवी आणि मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी करण्याची सूचना केली.
या फवारणीत लॅमडासायहॅलोथ्रिन ५ टक्के ६ मिली आणि कार्बेन्डॅझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्याचबरोबर वाढलेल्या थंडीमुळे ज्या आंबा बागा पालवी अवस्थेत आहेत त्यांना ताण बसून मोहोर येण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल तसेच अंक फुटण्याच्या अवस्थेत आहेत, त्यामधून वाढलेल्या थंडीमुळे मोहोर बाहेर येण्यास विलंब होऊ शकतो.
थंडी दवामुळे काजू पिकावर डेकण्या किडीचा तसेच मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काजू बागांची नियमित पाहणी करून आवश्यकतेनुसार आणि लॅमडासायहॅलोथ्रिन ५ टक्के ६ मिली आणि कार्बेन्डॅझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच रब्बी हंगामात लागवड केलेल्या कडधान्य, भाजीपाल्याला संध्याकाळी सिंचन करावे, असा सल्लाही कृषी विद्यापीठाने दिला आहे.
दुसऱ्या फवारणीची सूचना
थंडीचा तडाखा काही दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा पिकावर करपा रोगाचा तसेच तुडतुडे आणि फुलकिडी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी बागेची वारंवार पाहणी करून आवश्यकता वाटल्यास विद्यापीठाने शिफारशी केलेल्या पालवी आणि मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी करण्याची सूचना केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 21/Dec/2024