चिपळूण : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरॅक्ट क्लब शिरगाव व जय भवानी मित्रमंडळ यांनी संयुक्त विद्यमान शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. अनेक वर्षे मेहनत घेऊन खेड येथील कोकण दौलत प्रतिष्ठानने या शस्त्रांचे संकलन व जतन केले. या शस्त्रांची माहिती नवीन पिढीला व्हावी, यासाठी हे प्रदर्शन शिरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात भरविण्यात आले.
शिरगांव परिसरातील मंदार एज्युकेशन सोसायटी युनायटेड इंग्लिश स्कूल अलोने व पोफळी, शिरगाव विद्यालय व महाविद्यालय तसेच परिसरातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयातील शेकडो विद्याथ्यांनी व ग्रामस्थांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनात मांडलेल्या शिवकालीन प्रत्येक शस्वाचे विविध प्रकार व त्याचा वापर याबद्दल विस्तृत माहिती आयोजकांद्वारे देण्यात आली. ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या परिसरात अशी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ग्रामस्थ, पालक व शिक्षकवगनि आयोजकांचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 21/Dec/2024