संगमेश्वर : आ. किरण सामंत यांच्याकडून पुर्येतील धोकादायक पुलाची पाहणी

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये येथील धोकादायक पुलाच्या पुनर्बाधणीसाठी गेली दहा वर्षे कोनगाव पुर्ये, कोचरे, सालपे, शिपोशी या गावातील ग्रामस्थ वारंवार मागणी करत होते. परंतु, या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात होते. यासाठी दि. २२ डिसेंबर रोजी पुर्वे सरपंच बापू लोटनकर कोडेगाव कोचरी, सालपे, शिपोशी, कुरचुंब, तळवडे या गावच्या सरपंचांनी या पुलासाठी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदन देऊन निधीची मागणी केली. या पुलाची आ. सामंत यांनी नुकतीच पाहणी केली.

हा पूल संगमेश्वर तसेच लांजा तालुक्याला जोडणारा व पर्यटनस्थळ असणारे माचाळला जोडणारा अत्यंत सोपा मार्ग आहे. कोचरी, सालपे, शिपोशी येथील ग्रामस्थांना साखरपा बाजारपेठ ही जवळ पडते त्यामुळे हा पूल झाला तर या गावांना याचा खूप मोठा फायदा आहे. त्याचबरोबर एस. टी. देखील या गावातून लांजा तालुक्याला जाऊ शकते. त्यामुळे हा पूल होणे गरजचे आहे. या आधी सरपंच बापू लोटणकर यांनी तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेनाद्वारे मागणी केली होती. मात्र, त्या मध्ये यश आले नव्हते. मात्र, आता किरण सामंत आमदार झाल्यामुळे या कामासाठी निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा सरपंच बापू लोटणकर यांनी व्यक्त केली. या भागासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या या पुलाची मागणी केल्यानंतर त्वरित आमदार किरण सामंत यांनी या पुलाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. त्याचबरोबर या पुलाची गरज ओळखून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 24/Dec/2024