देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, रोहित पवारांची अमित शाहांकडे मागणी

पुणे : “आमचे गृहमंत्री धोक्यात आहेत. फडणवीसांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केलीय मी अमित शहांना विनंती करतो की, देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी”, असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय.

ते पुण्यातील राष्ट्रवादीच्या सभेत बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर दि.27 रोजी एका महिलेने हल्ला केला. दरम्यान, सर्व सुरक्षा यंत्रणा भेदून महिलेने कार्यालयावर हल्ला केल्याने विरोधकांनी गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज फडणवीस यांच्यावर उपाहासात्मक टीका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनीही अमित शाहांकडे फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी करत टीका केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 28-09-2024