रत्नागिरी : राष्ट्रीय भूमिका अभिनय स्पर्धेत दामले विद्यालय करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

रत्नागिरी : नवी दिल्ली, SCERT महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे २१ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत दामले विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. योगेश कदम लिखित व शाहवाज गोलंदाज दिग्दर्शित ‘वैयक्तिक सुरक्षा’ हे स्कीट स्वरा चौगुले, श्रेया देसुरकर, मनस्वी तोडणकर, रिया मांडवकर व यश बागकर या विद्यार्थ्यांनी सादर केले. दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान ग्वाल्हेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय भूमिका अभिनय स्पर्धेत दामले विद्यालय महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 25/Dec/2024