ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त स्वगुही सेवा संस्था रत्नागिरी शिरगाव वृद्धाश्रमामध्ये धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी तालुक्याचे आमदार श्री. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना रत्नागिरी च्या वतीने स्वगुही सेवा संस्था रत्नागिरी शिरगाव रत्नागिरी या वृद्धाश्रमामध्ये धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरवण्यात आला.

त्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, शिवसेना महिला शहरप्रमुख स्मितल पावसकर, महिला तालुकाप्रमुख कांचनताई नागवेकर, नगरसेविका दिशा ताई साळवी, श्रद्धा हळदणकर, शहर संघटक सौरभ मलुष्टे, शहर महिला संघटक पूजाताई पवार, युवा सेना चे दुर्वेश पांगम, राजेश आराध्यमठ, पप्पू सुर्वे उपशहर प्रमुख सुहासिनी भोळे, शाखाप्रमुख अविनाश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 25-12-2024