आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना जैवविविधता बोर्डकडून २८ लाख ५० हजारांचे अनुदान

साडवली : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना महाराष्ट्र राज्य जैवविविधता बोर्डाकडून २८ लाख ५० हजार रुपये अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. या प्रकल्पात कोकणातील रानभाज्या आणि जंगली फळे यांचे पोषण मूल्य, उपलब्धता, औषधी गुणधर्म, आर्थिक संधी यावर संशोधन होणार आहे. डॉ. नाईकवाडे या संशोधनाचा आहे. कालावधी तीन वर्षे आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत हा एकमेव प्रकल्प मंजूर झालेला आहे. आठवडाभरापूर्वी महाविद्यालयाच्या स. का. पाटील संशोधन केंद्रामधून विज्ञान विषयातील पहिली विद्यावाचस्पती पदवी डॉ. अनिल निकम यांनी रसायन शास्त्र विषयात मिळवली. त्यांच्या यशानंतर लगेचच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाईकवाडे यांना महाराष्ट्र राज्य जैवविविधता बोर्डाकडून २८ लाख ५० हजार रुपये अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. ही गोष्ट अभिमानास्पद यश आहे.

या संशोधन प्रकल्पातून भविष्यात कोकणातील शेतकरी व बागायतदारांना लाभ होऊ शकणार आहे. डॉ. नाईकवाडे यांच्यासारखे संशोधक-प्राध्यापक निर्माण करून कोकण विकासाला चालना मिळावी यासाठी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध आहे. डॉ. नाईकवाडे यांचे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन केले आहे.

यापूर्वीही मिळाले होते अनुदान
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये डॉ. नाईकवाडे यांना राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीअंतर्गत अशाच प्रकारच्या संशोधनासाठी यापूर्वी त्यांना पाच रुपये लाख अनुदान मंजूर झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 25/Dec/2024