Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात तेजी

कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचा पाहायला मिळालं. या आठवड्यात सोने अन् चांदीच्या दरात वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोनं 76600 रुपयांवर तर एक किलो चांदी 89500 रुपयांवर होती.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली. सकाळी 10 वाजता एमसीएक्सवर सोन्याचादर 346 रुपयांनी वाढले. 10 ग्रॅम सोन्याचे दर 76616 रुपयांवर पोहोचले होते. मंगळवारी सोन्याचे दर 76270 रुपयांवर होते.

चांदीच्या दरात देखील 322 रुपयांची वाढ झाली. चांदीचे दर 89648 रुपये किलोवर पोहोचले तर मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा 89326 रुपये किलो होती.

सराफ बाजारात सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 78600 रुपये होते. सराफ बाजारात चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून 90500 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या आठवड्यात सोने दरात काल घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या आठवड्यात सोने दरात वाढ झाली असल्याचं जेएम फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रणव मेर म्हणाले.

(टीप : ही माहिती प्राथमिक असून प्रत्यक्ष बाजारात वेगळे दर असू शकतात )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 26-12-2024