नवी दिल्ली : दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे. मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.
कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते –
यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, (CM Atishi) दिल्लीतील लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते.
“या संकटाने सर्वांच्याच मात दहशत निर्माण केली होती. मात्र, आपले डॉक्टर, मेडिकल स्टाफ, सहायक स्टाफ आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह हजारो लोकांनी रात्रंदिवस काम करून या महामारीचा सामना करण्याचे काम केले. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. सरकार या लोकांच्या कुटुंबीयांसह नेहमीच खांद्याला खांदा लावून उभे आहे,” असेही आतिशी म्हणाल्या.
या लोकांच्या कुटुंबीयांना मिळणार मदत –
संजय मनचंदा, फार्मासिस्ट एसडीएमसी –
मनचंदा हे कोरोना काळात एसडीएमसी पेशन्ट केअर फॅसिलिटीमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. याशिवाय, ते आशा वर्कर्स आणि एएनएमसोबत कंटेनमेंट झोनलाही भेट देत होते. सेवेवर असतानाच त्याला कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.
रवि कुमार सिंह –
रवी कुमार हे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत होते. येथे कर्तव्यावर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
वीरेंद्र कुमार –
वीरेंद्र कुमार एक सफाई कर्मचारी होते, ते कोरोना काळात भूक निवारण केंद्रातील साफसफाईचे काम बघत होते. ड्युटीवर असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि काही दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला.
भवानी चंद्र –
भवानी चंद्रा हे दिल्ली पोलिसात एएसआय होत्या, ते कोरोना काळात लोकनायक रुग्णालयात ड्युटीवर होते. ड्युटीवर असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
मो. यासीन –
मोहम्मद यासीन एमसीडीमध्ये प्राथमिक शिक्षक होते. कोरोना काळात, मोहम्मद यासीन रेशन वितरण कर्तव्यावर होते. यादरम्यान, त्यांनाही कोरोना संसर्ग झाला आणि काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 28-09-2024