साठरे बांबर प्रीमिअर लीग उत्साहात संपन्न

पाली : तालुक्यातील नजीकच्या साठरे गावामध्ये नुकत्याच साठरे बांबर प्रीमिअर लीग (SBPL)२०२४ पर्व दुसरे ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये गावतील एकूण ८ संघ सहभागी होते. सुमारे १२० अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता.

या स्पर्धेचे महत्व म्हणजे व्यसनमुक्त स्पर्धा आणि वाद विरहित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते व या वर्षीही हीच परंपरा या स्पर्धेत टिकून राहून स्पर्धा शांततेत पार पडली. या स्पर्धेचा पहिला क्रमांक हा श्रीराम रसाळ यांच्या अयोध्या वॉरियर्स या संघाने पटकावला. द्वितीय पारितोषिक हे नयन साठले यांच्या आदिशक्ती स्पोर्ट्स या संघाने पटकावला. तसेच तृतीय क्रमांक संदीप पवार यांच्या श्रेयश आर्मी सावंतवाडा या संघाने पटकावला. तसेच चतुर्थ क्रमांक हा गजानन सावंत (सर) यांच्या अथांग ११ संघाने पटकावले.

या स्पर्धेचा मालिकावीर व सामनावीर पुरस्कार हा प्रदीप सावंत याला मिळाला. तसेच गोलंदाज विश्वास (बाबू) चव्हाण यांना मिळाला व फलंदाज जयदीप(चिंटू)सावंत याला प्रदान करण्यात आला. या स्पर्धेसाठी गावातील सर्वच ग्रामस्थ यांचे योगदान महत्वाचे होते. तसेच ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील क्रीडा प्रेक्षक यांची गर्दी होती. व मान्यवर मंडळी यांनीही या स्पर्धेला हजेरी लावली. स्पर्धेच्या कमिटीच्या वतीने विविध बक्षीस ठेवण्यात आली होती व यशस्वी स्पर्धा या कमिटी कडून पार पाडण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 30-12-2024